प्रतिनिधी । सोलापूर
पिढ्यान पिढ्या शहरातील ८१३ मिळकती आणि ९ हजार कुटुंब व ४० ते ५० हजार रहिवाशांना आज आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्याने घेतलेल्या पाठपुराव्यामुळे भोगवटदार वर्ग दोन मिळकती आता फ्री होल्ड करण्याचा निर्णय शासनाने घोषित केला. ही वार्ता समजताच सोलापुरातील भोगवटदार मिळकतींधारक नागरिकांना प्रचंड आनंद झाला आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी जल्लोष साजरा केला आहे. गेल्या अनेक दशकात निवडून दिलेल्या खासदार आमदार यांच्या कारकीर्दीत त्यांना जमलं नाही अशी गोष्ट पहिल्यांदाच आमदार बनलेल्या मात्र मुरब्बी राजकारणी देवेंद्र कोठे यांना हे जमले असे कौतुक नागरिकांनी केले आहे.
का आवश्यक होते बी 2 हटणे
गेल्या अनेक दशकापासून ८१३ मिळकती सन १९१४ ते १९१७ या ब्रिटीशकालीन कालखंडात लिलावाद्वारे भाडे मुदतीने (लीज होल्ड) देण्यात आल्या होत्या. या कोणत्याही प्रकारच्या मिळकती विकताना शासनाकडे 25% महसूल जमा करावा लागत असे त्यामुळे जागा विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा व्यवहार हा बहुतांशी होत नसे. त्यामुळे पुनर्विकास किंवा नवीन काही विकासात्मक कामे करणे शक्य नव्हते. पण आता या निर्णयाने रकमा कमी भराव्या लागणार आहेत. शिवाय पूर्वीच्या खरेदी खताच्या ज्या त्या काळच्या रकमा होत्या त्या रकमांवरतीच आधारित २.५ टक्के महसूल भरावा लागणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मिळकतीचा व्यवहार करणे किंवा त्याचा पुनर्विकास करणे हे शक्य होणार आहे त्यामुळेच नागरिकात आनंद पसरला आहे.
पावसामुळे पुढे गेलेली बैठक आनंद वार्ता घेऊन आली
दिनांक ९ जुलै 2026 रोजी विधान भवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृतरित्या हा निर्णय जाहीर केला. मात्र त्याआधी आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत सातत्याने बैठका घेत पाठपुरावा केला होता. मात्र नुकत्याच ७ आणि ८ तारखांना झालेल्या पावसामुळे बैठक पुढे ढकलली जात होती. मात्र तिथेही न थकता कोठे यांनी ही बैठक होईपर्यंत विषय लावून धरला आणि मंत्र्यांना हा विषय पटवून दिला नागरिकांच्या हिताचे हे काम होणे कसे गरजेचे आहे हे सांगितले आणि त्यातून हा निर्णय घोषित करण्यात आला बैठकीमधूनच ही आनंदवार्ता पुढे आली.

