Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

बापरे… डेटिंग ॲपद्वारे तरुणाला गोड बोलून बोलवलं, अन मारहाण करून ३० हजार उकळले

Admin by Admin
July 13, 2026
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड । ५ जणांवर गुन्हा, दोघांना अटक

 

प्रतिनिधी । सोलापूर

गोड गोड बोलत डेटिंग ॲपवर ओळख करून एका २८ वर्षीय तरुणाला निर्जन ठिकाणी बोलावून घेत, त्याला बेदम मारहाण करत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अठ्ठाविस वर्षीय तक्रारदार तरुणाने काही दिवसांपूर्वी मोबाईलमध्ये डेटिंग ॲप डाऊनलोड केले. ५ जुलै रोजी या ॲपवर त्यांची ‘Top 20’ नावाच्या एका प्रोफाईल धारकाशी ओळख झाली. त्या व्यक्तीने अभिषेक यांना विजापूर रोडवरील सोनी कॉलेजजवळ भेटायला बोलावले. तो तरुण तिथे गेले असता, त्या व्यक्तीने त्याला स्वतःच्या दुचाकीवर बसवले. मात्र, रूमकडे न नेता तो त्याला एका शेतातील दगडी खोलीत घेऊन गेला.

त्यानंतर त्याला कपडे काढायला सांगितले अभिषेक यांनी कपडे काढल्यानंतर तिथे अचानक इतर ५ जण आले. त्यांनी “तू आमच्या जागेत घाणेरडे कृत्य करत आहेस असे म्हणत तक्रारदार तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने मोबाईलवर व्हिडिओ देखील शूट केला. अभिषेक यांनी सुटका करण्याची विनवणी केली असता, आरोपींनी “सुटायचे असेल तर एक लाख रुपये दे, नाहीतर विहिरीत ढकलून देऊ आणि व्हिडिओ व्हायरल करू,” अशी धमकी दिली.

मारहाणीला घाबरून अभिषेक यांनी त्यांच्या बँक खात्यात असलेले ७,००० रुपये आणि भावाकडून ऑनलाईन मागवून घेतलेले २३,००० रुपये असे एकूण ३०,००० रुपये आरोपींनी दिलेल्या स्कॅनरवर पाठवले. या त्रासातून सुटल्यानंतर त्याने आधी सायबर पोर्टलच्या ‘1930’ या क्रमांकावर तक्रार नोंदवली आणि ११ जुलै रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. त्यानुसार
समर्थ कापसे (रा. दावत चौक, सोलापूर)
किरण अशोक राठोड (वय १९, रा. कल्याण नगर, सोलापूर)) रितेश बनसोडे (रा. लिमयेवाडी, सोलापूर) स्वयंम पडळकर (रा. अंबर हॉटेलच्या मागे, सोलापूर) समर्थ अमोल चव्हाण (वय २०, रा. शहा नगर, लिमयेवाडी, सोलापूर)
यांच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१०(२), ११५(२), ३५२, आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार निवृत्ती गायकवाड करत आहेत.

Previous Post

यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा ; प्रवाशांना लुटून केली मारहाण

Next Post

सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू ; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा पुढाकार

Admin

Admin

Next Post

सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू ; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697