Monday, October 5, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

सरकारी सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना आता खासगी सेवा करता येणार नाही संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय

Admin by Admin
August 3, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय, म्हणजेच प्रायव्हेट प्रॅक्टिस, करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सरकारी सेवेत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि शासनाच्या धोरणांनुसार बांधील आहेत. त्यामुळे त्यांनी पूर्णवेळ सरकारी सेवा बजावणे आवश्यक आहे. सरकारी सेवेत असताना खासगी व्यवसाय केल्यास त्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.यासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावत हा निर्णय कायम ठेवला आहे.या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे.या प्रकरणात शासनाच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता अतुल काळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तर आरोग्य विभागाचे विधी सल्लागार अॅड. सतीश भेंडकर यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, शिस्त आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर बंदी घालणारा हा निर्णय आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, या निर्णयामुळे सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसबाबत सुरू असलेल्या सर्व याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या आणि स्वतःचे खाजगी रुग्णालय ही चालवणाऱ्या डॉक्टरांची आता काळजी वाढणार आहे.

Previous Post

सोलापुरात भाजप नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊत विरुद्ध दिली फौजदार चावडीत तक्रार

Next Post

देखण्या पारंपारिक अलंकारात सजलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची झाली प्रक्षाळ पूजा

Admin

Admin

Next Post

देखण्या पारंपारिक अलंकारात सजलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची झाली प्रक्षाळ पूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697