Saturday, November 21, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

मनपाच्या अभय योजनेतून १ कोटी ८२ लाख वसुली फत्ते

Admin by Admin
August 7, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासोबतच महापालिकेच्या मालकीच्या गाळे आणि इतर भाडेतत्त्वावरील मालमत्ताधारकांना थकीत भाडे भरण्यास दिलासा मिळावा, या उद्देशाने ‘अभय योजना–२०२६’ लागू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ मेजर गाळेधारक, मिनी गाळेधारक, खुल्या जागेचे धारक, अधिकृत खोकेधारक, बीओटी गाळेधारक, १५६ गाळेधारक तसेच टी.पी. ३/२३ अंतर्गत येणाऱ्या भाडेकरूंना घेता येणार आहे.चालू वर्षाचे भाडे आणि मागील थकबाकी मिळून महापालिकेने या योजनेतून तब्बल २५ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे.योजना सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला असून, या कालावधीत १ कोटी ८२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर थकीत रकमेवरील तब्बल ३७ लाख रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार गाळेधारकांना दंडाच्या सवलतीसह आपली थकबाकी भरून नियमित होण्याची संधी मिळाली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जात असून, येत्या काळात वसुलीला आणखी वेग देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, ‘अभय योजना–२०२६’ची अंतिम मुदत २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांनी या संधीचा लाभ घेत थकीत गाळेभाडे आणि इतर देय रक्कम भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे.

Previous Post

सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपारिक वस्त्रोद्योगात समाविष्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Next Post

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त खासदार ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली सोलापुरी भेट

Admin

Admin

Next Post

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त खासदार ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली सोलापुरी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697