
प्रतिनिधी । सोलापूर
शहरातील रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीतच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. छातीत तीव्र वेदना होत असल्याने रुग्ण उपचारासाठी आला होता. तपासणी सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती गंभीर झाली.
घटना लक्षात येताच ओपीडी स्टाफने क्षणाचाही विलंब न करता CPR सुरू केले. डॉक्टर शैलेश पाटील यांनी पुढाकार घेत रुग्णावर तातडीने CPR केला. त्यानंतर आवश्यकतेनुसार डिफिब्रिलेशनचा शॉक देत डॉ शैलेंश पाटील पुढील आपत्कालीन उपचार करण्यात आले. वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.
या घटनेचे CCTV फुटेज हॉस्पिटलमध्ये कैद झाले आहे. काही सेकंदांत सुरू करण्यात आलेले CPR आणि त्यानंतरचे आपत्कालीन उपचार रुग्णासाठी जीवदान देणारे ठरले. हृदयविकाराच्या प्रसंगी तातडीने CPR आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले.