Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

: रंगनाथन यांचे चरित्र :

Admin by Admin
August 9, 2026
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृतम रंगनाथन यांचा जन्म 9ऑगस्ट 1892 रोजी मद्रास प्रंतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली ह्या गावी झाला त्यांचे शालेय शिक्षण शियाली येथील हिंदु हायस्कुलमध्ये झाले. 1909 साली मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमधून इंग्रजी विषय घेऊन ते बी.ए.झाले. गणित विषय घेऊन त्यांनी 1916 साली एम. ए. ही पदवी संपादन केली. 1917 साली मद्रास विद्यापीठातुनच एल. टि. ही अध्यापनशास्त्राची पदविका मिळविली. 1917 ते 1923 ह्या कालखंडात मद्रास विद्यापीठात ते गणिताचे प्राध्यापक होते. 1924 साली त्याच विद्यापीठात त्यांची ग्रंथपाल म्हणून नेमणूक झाली. त्याचवर्षी ग्रंथालय शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी विद्यापिठाने त्यांना इंग्लंड्ला ब्रिटीश म्युझीयम ग्रंथालयात पाठवले. तिथे गेल्यानंतर त्यांना असे आढळले की ब्रिटिश म्यझीयम मध्ये ग्रंथालय शिक्षणाची सोय नाही. म्हणून ते लंडन युनिव्हसिटीच्या ‘स्कूल ऑफ लायब्ररी सायन्स’ ह्या संस्थेत दाखल झाले. प्रसिध्द ग्रंथपाल डब्ल्यूसी बार्विक सेयर्स यांनी त्याना वर्गीकरण शिकविले. इ.स1925 साली रंगनाथन भारतात परतले 1924 ते 1944 अशी सुमारे वीस वर्षे ते मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल होतें. नंतर बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी 1945 ते1947 ह्या कालखंडात डॉ. राधाकृष्णन यांच्या विनंतीवरुन ग्रंथपाल म्हणुन काम केले. सर मॉरीस ग्वायर यांच्या सांगण्यावरुन डॉ. रंगनाथन 1947 साली दिल्ली विद्यापीठात ग्रंथालय शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1962 साली बंगलोर येथे डॉक्यूमेंटेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटर ही संस्था सुरु केली. 1974 साली म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यत वे बंगलोर येथेच कार्यमग्न होते.
डॉ. रंगनाथन यांनी केलेल्या अजोड कामगिरीमुळेच त्यांना भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणुन संबोधण्यात येते . भारतात 1929 साली पहिला अभ्यासक्रम रंगनाथन यांनी सुरु केला व ग्रंथालयशास्त्राचा पाया घातला. 1937 साली मद्रास विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरु केला. दिल्लीला असताना त्यांनी ग्रंथालय शास्त्रात पी. एच. डी. चा अभ्यासक्रमही सुरु केला.
डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राच्या विविधांगांवर सुमारे 50 ग्रंथ लिहिले,1000 लेख लिहिले. ग्रंथालयीन कारभार , ग्रंथालयीन वर्गीकरण प्रवेश, ग्रंथकार सुचीकरण तात्विक, संदर्भ सेवा व वाडमय सूची खंड 1 व 2 शासकिय महाविद्यालयीन ग्रंथालये भारतीय ग्रंथालय योजना ग्रंथालय सूचीकरण वगैरे त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत. ग्रंथालय शास्त्रातील पाच सुत्रे व व्दिबिंदू वर्गीकरण ह्या दोन ग्रंथानी डॉ, रंगनाथन जागतीक कीर्ती मिळवूण दिली. ग्रंथालय शास्त्राची पाच सुत्रे ही सर्व दिव्दानांनी मान्य केली. डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय शास्त्रावरील लिखाण विस्तृत आणि शास्त्राच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे आहे. वर्गीकृत तालिका नियमावली ही अशीच शास्त्रीय पायावर उभारलेली तालिका नियमावली होय.
डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथपालनाचा व्यवसाय स्विकारल्यावर ह्या व्यवसायाकरिता, त्यांनी तन मन धन सर्वस्व पणाला लावले. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कार्यात ते सदैव अग्रभागी राहिले. ग्रंथालयांच्या विकासाकरिता संघटनांची आवश्यकता आहे. हे त्यांनी लक्ष केंद्रीय केले. 1928 साली त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. त्यांच्याच पुढाकाराने 1933 साली भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना झाली. 1944 ते 1955 पर्यंत ते या संघाचे अध्यक्ष होते.
ग्रंथालयांच्या प्रसारासाठी ग्रंथालय कायद्याची आवश्यकता आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यानी त्या दृष्टीने जोमाने प्रयत्न केले. 1942 साली ग्रंथालयीन कायद्याचा मसुदा तयार केला. मद्रास प्रांतात 1948 साली डॉ. रंगनाथन यांच्या प्रेरणेने ग्रंथालय कायदा मंजूर झाला. हा भारतातील पहिला ग्रंथालय कायदा होय. नंतर इतर राज्यातही ग्रंथालय कायदे मंजूर झाले.
डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय चळवळीला जगात मान्यता मिलवून दिली. डॉ. रंगनाथन यांना 1935 साली ब्रिटिशसरकारने, ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल , रावसाहेब ही पदवी दिली. 1948 साली दिल्ली विद्यापीठाने डी. लीट ही पदवी , 1957 साली भारत सरकारने त्यांना पदमश्री 1964 साली भारत सरकारने नॅशनल रिसर्च प्रोफेसर ऑफ लायब्ररी ही मानाची जागा तसेच त्याच वर्षी अमेरिकेतील पिट्सबर्ग ह्या विद्यापीठाने त्यांना डि. लिट ही पदवी दिली. 1970 साली त्यांना अमेरिकेतील लायब्ररी असोसिएशनने मार्गारेट मान हा पुरस्कार दिला.
ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाते। ग्रंथालय शास्त्रचे पाच सिद्धांत लिहले। सर्वसामान्य वाचकाला समजतिल अशा भाषेत आहेत्। 1)ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत।2) प्रत्येक वाचकाला त्याला हवा असलेला ग्रंथ मिळाला पाहिजे3) प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळालाच पाहिजे 4) वाचकाचा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचला पाहिजे 5) ग्रंथालय ही वर्धीष्णू संस्था आहे प्रत्येक सुत्राचा विचार करताना त्या सूत्राच्या अंमलबजावणीसाठी समावेशक वर्गीकरण , समावेशक तालिकीकरण , अनुरुप संदर्भसेवा त्याच बरोबर मुक्तद्वार पध्दति,बहिशाल योजना , नवनवीन साधनांचा ग्रंथालयात अंतर्भाव म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान ग्रंथालयाचे नियम वाचकांची वर्गवारी ह्या सर्व गोष्टीचा विचार त्यांनी त्या सुत्राच्या समावेश केला आहे. ग्रंथालयशास्त्रा शिवाय डॉ. रंगनाथन यांनी फक्त एकच पुस्तक लिहिले आणि ते म्हणजे जगदविख्यात गणिती रामानुजन यांचे चरित्र होय.
ग्रंथालय आणि ग्रंथालयशास्त्राला नवी दिशा देणारे डॉ रंगनाथन अखेरच्या श्र्वासापर्यंत त्या कार्याशी एकनिष्ठ राहिले ग्रंथालयशास्त्राला परिपूर्णता देऊन बंगलोर येथे 27 सप्टेंबर 1972 साली ते कालवश झाले.
भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त( 12 ऑगस्ट)राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा कारण्यात येतो. यानिमित्त वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी .यासाठी ग्रंथपाल दिन साजरा केला जातो

श्री . दत्तात्रय मोरे
ग्रंथपाल
श्री हिराचंद नेमचंद वाचनालय,सोलापूर
मो. 7972682423

Previous Post

ओपीडीत हृदयविकाराचा झटका; तत्पर CPR मुळे ५५ वर्षीय रुग्णाला जीवदान

Next Post

जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड

Admin

Admin

Next Post

जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697