Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप सोलापूर न्यायालयाचा निकाल

Admin by Admin
July 10, 2026
in solapur
0
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

शाळेत जाणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर निर्घृण लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सोलापूर न्यायालयाने मरेपर्यंत तुरुंगवासाची ऐतिहासिक आणि कठोर शिक्षा सुनावली आहे. सोलापूरचे जिल्हा व विशेष न्यायाधीश जे. जे. मोहीते यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, आरोपीला मरेपर्यंत कारावास आणि एकूण ७१ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. बापू सिद्धप्पा कुसेकर (वय २५, रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

हे धक्कादायक प्रकरण २०१४ मधील आहे. पीडित मुलगी अवघ्या ९ वर्षांची असताना, ती शाळेत जात असताना आरोपी बापू कुसेकर याने तिला तिच्या आईच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या आणि जबरदस्तीने पळवून नेले होते. त्यानंतर अक्कलकोट परिसरातील एका निर्जन दगडाच्या खाणीत नेऊन, आरोपीने तिला अमानुष मारहाण केली आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. ही निष्पाप मुलगी नंतर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी पीडितेच्या आईने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तिवाद ठरला प्रभावीया गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे आणि काकडे यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध भक्कम आणि तांत्रिक पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता ॲड. कविता बागल यांनी प्रभावी काम पाहिले.
खटल्या दरम्यान सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे, पीडितेची साक्ष, तिला पळवून नेताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टरांची वैद्यकीय साक्ष आणि तांत्रिक पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले. ॲड. कविता बागल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) व इतर कलमांखाली दोषी ठरवून ही कठोर शिक्षा सुनावली.
हा खटला तार्किक शेवटास नेण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि तत्कालीन एसडीपीओ विलास यामावार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, प्रभारी अधिकारी अविनाश पवार यांच्या मदतीने कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अजित सुरवसे आणि सचिन पुजारी यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.आरोपी बापू कुसेकर

Previous Post

९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप सोलापूर न्यायालयाचा निकाल

Next Post

सांगोला येथे १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Admin

Admin

Next Post

सांगोला येथे १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697