Monday, October 5, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

उजनी धरणातून ८० हजार तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ क्युसेक्स विसर्ग

Admin by Admin
July 31, 2026
in solapur
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने दुपारी ४:०० वाजता उजनी धरणातून ८० हजार क्युसेक्स तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ विसर्ग असा एकूण १ लाख ४३ हजार ३२३ क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा निरा नरसिंहपुर (संगम) येथे भीमा नदीत मिसळत असल्याने नीरा व भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

यंत्रणेला दिल्या सूचना …

उजनी व निरा संगमाचा विसर्ग भीमा नदीपात्रात एकत्रित पोहोचणार असल्याने धोक्याची पाणी पातळी वाढ होण्याची शक्यता आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी भीमा नदीकाठच्या सखल गावांना व वाड्यावस्त्यांना तसेच पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांना तात्काळ सतर्कतेचा इशारा द्यावा. नदीपात्रातील जनावरे, इलेक्ट्रीक पंप हलवावे गाव पातळीवर दौंडीद्वारे जाहीर सूचना द्याव्यात . पोलीस प्रशासनाने घाटावर व नदीपात्रात प्रवेश बंदीची अंमलबजावणी सुरू करावी. वाळवंट परिसरातील वारकरी भाविक यांना नदीपात्रातून दूर हलवावे. गस्त वाढवून आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे . पाटबंधारे विभागाने दर तासाला पाणी पातळी व धरणातील विसर्ग बाबत अद्यावत माहिती नियंत्रण कक्षास कळवावी. आरोग्य विभागाने नदीकाठच्या उपकेंद्रावर आपत्कालीन वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा. वीज वितरण विभागाने नदीकाठचे विद्युत वाहिन्या रोहित्र तपासून आवश्यकतेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याबाबत आवश्यकती कार्यवाही करावी .
नगरपालिका प्रशासनाने सकल भागातील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र व ड्रेनेज पंप तपासावेत व तात्पुरती निवारा केंद्र सज्ज ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीत बोट व जीव रक्षक साहित्य करावे. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवावा. पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरपरस्थितीत नदीपात्रावरील घाट व प्रवेश बंद ठेवावा. सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील व नदीकाठावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवावी. भीमा नदी पात्रात पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये सर्व विभागांनी पूरनियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी अशा सूचना ही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या आहेत.

Previous Post

राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई , चिंचोली एमआयडीसीत दोन कोटी ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Next Post

शहरवासीयांनो जागे व्हा सायबर फसवणुकी पासुन सावध रहा पोलिसांचे आवाहन

Admin

Admin

Next Post
शहरवासीयांनो जागे व्हा सायबर फसवणुकी पासुन सावध रहा पोलिसांचे आवाहन

शहरवासीयांनो जागे व्हा सायबर फसवणुकी पासुन सावध रहा पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697