Monday, October 5, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

शहरवासीयांनो जागे व्हा सायबर फसवणुकी पासुन सावध रहा पोलिसांचे आवाहन

Admin by Admin
July 31, 2026
in maharashtra
0
शहरवासीयांनो जागे व्हा सायबर फसवणुकी पासुन सावध रहा पोलिसांचे आवाहन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

सोशल मिडीयलयातील फेसबुक / इंन्स्टाग्राम / टेलिग्राम / वॉटसअॅप / युट्युब / शेअरचॅट यावर आर्थिक फसवणुकीचे शेअर बाझार गुंतवणुक, टास्क अश्या भ्रामक आकर्षक जाहिरातीव्दारे लोकांची मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरीकांचे बँक खात्याचा वापर केला जात असल्याने, सर्वांनी जागरुक राहणे अंत्यत गरजेचे झाले आहे. असे आवाहन सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवून, धमकी, डिजिटल अरेस्ट, सोशल मिडीया अकाऊंट हॅक करने, शेअर बाजार गुंतवणुक, नोकरी लावणे, ऑनलाईन टास्क पुर्ण करुन मोठ्या प्रमाणात कमाई करने वगैरे प्रकारचे कृत्य करुन त्यांचेकडुन ल प्रमाणात रक्कम उकळण्याचे गुन्हे करीत आहेत. अशा गुन्हयातील रक्कम ही बँक खात्याव्दारे सायबर गुन्हेगार यांचेपर्यत पोहचत आहेत.

सर्वसामान्य लोक अमिषाला बळी पडुन स्वतःचे नावाने बँक खाती काढुन ती सायबर गुन्हेगारांना वापरण्यासाठी देत आहेत. सायबर फ्रॉड संबंधाने या खात्यांना मनिम्युल बँक अकाउंट असे संबोधले जाते. अशा खात्यांबाबत प्राप्त तक्रारीवरुन महाराष्ट्र सायबर विभागाने अशी खाती शोधुन काढली असुन, त्यावर खात्री करुन संबंधीत सायबर पोलीस ठाणे किंवा युनिटकडुन गुन्हे दाखल करण्याचे काम मागील काही दिवसांपासुन सुरु आहे. सोलापूर शहरामध्ये मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मा. पोलीस उप-आयुक्त साो (गुन्हे/विशा), सोलापूर शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त साो, (गुन्हे), यांचे मार्गदर्शनात जवळपास अशी ४०० ते ४५० चे असपास म्युल अकाऊंट असल्याची माहिती गोळा करण्यात आली असुन, त्या खात्यांबाबत बँकांकडुन माहिती मागुन ते खातेधारक (अकाऊंट होल्डर) यांचेवर बीएनएस अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सोलापूर शहर पोलीसांकडुन सुरु करण्यात आली आहे. अत्तापर्यत ११० अकाऊंट होल्डर यांचेवर त्यांनी त्यांचे बँक खाते सायबर गुन्हेगारांशी संगणमत करुन सायबर फ्रॉड मधील रक्कम स्विकारणे, पुढे पाठविणे, वेगवेगळे ट्रांन्झाक्शन करणे यासाठी वापरली आहेत म्हणुन बीएनएस कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन पुढील तपास सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणेकडुन सुरु आहे.

त्यामुळे कोणीही आपले बैंक खाते, स्वतःचे नावाने असलेले बँक खात्याचे ऑनलाईन अॅक्सेस देवु नये, बँक खात्याचे लिंक चेकबुक, एटीएमकार्ड तसेच मोबाईल सिमकार्ड इतर कोणालाही वापरण्यासाठी देवू नये त्याचा वापर सायबर गुन्हेगारीसाठी किंवा इतर गुन्हेगारी कृत्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कायदेशीर कारवाईसाठी सामोरे जावे लागेल.

तसेच स्वतःची फसवणुक टाळण्यासाठी सोशल मिडीयाव्दारे, वॉटसअॅप कॉल, हिंदी /इंग्रजी भाषे मध्ये फोन कॉल वगैरे वरुन बोलून भिती व समाजात बदनामी होईल अशी भिती दाखवत आर्थिक फसवणूकीच्या घटना घडत असतात अशा प्रकारच्या घटने संदर्भात कोणास कॉल अथवा सोशल मिडीयावरुन व्हीडीओ कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद न देता सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय, तिसरा मजला, सोलापूर शहर किंवा जवळच्या पोलीस ठाणे येथे तक्रार करावी तसेच एनसीआरपी हेल्पलाईन क्रमांक १९३० यावर संपर्क साधुन तक्रार दयावी असे आवाहन गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केले आहे.

Previous Post

उजनी धरणातून ८० हजार तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ क्युसेक्स विसर्ग

Next Post

द्दवाढ भागात उभारणार नवीन सबस्टेशन

Admin

Admin

Next Post

द्दवाढ भागात उभारणार नवीन सबस्टेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697