Monday, October 5, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

द्दवाढ भागात उभारणार नवीन सबस्टेशन

Admin by Admin
July 31, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

सोलापूर शहरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम व अखंडित करण्याच्या दृष्टीने हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणे, धोकादायक वीजतारा हटविणे, भूमिगत केबल टाकणे, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक सर्व्हिस वायर उपलब्ध करून देणे तसेच शहरातील विविध प्रलंबित वीजविषयक प्रश्नांवर आज महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर यांच्या उपस्थितीत व महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी महापौर कोंड्याल यांच्या हस्ते नीता केळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बैठकीस शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी ताई तडवळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता विनायक इदायते, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, नगरसेवक बिजू प्रधाने,नगरसेवक सत्यनारायण गुर्रम,नगरसेवक रवी कयावले, नगरसेवक भीमाशंकर केंगनाळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सहसचिव मल्लिकार्जुन कमटम, खजिनदार अंबादास भिंगी, संचालक नारायण आडकी, तसेच महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, महादेव इंगळे, मधुसूदन जंगम आदी उपस्थित होते.

बैठकीत हद्दवाढ भागात नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी आवश्यक मोकळी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

शहरातील अनेक भागांत वीजतारा घरांना लागून असल्याने किंवा धोकादायक स्थितीत असल्याने त्या तातडीने हटवून आवश्यक ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याबाबत महापौरांनी सूचना केल्या. नवीन केबल टर्मिनेशन, सर्व्हिस वायरची उपलब्धता, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक विद्युत जोडण्या उपलब्ध करून देणे, धोकादायक विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर तसेच शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील धोकादायक केबल हटविण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला.

अमृत योजनेअंतर्गत देसाईनगर येथील एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पूर्ण झाल्याने तो कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ११ केव्ही विद्युत वाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच महानगरपालिकेच्या स्मशानभूमींमधील वीज सुविधांचे बळकटीकरण, आवश्यक ठिकाणी विद्युत जोडण्या उपलब्ध करून देणे, शहरातील एलईडी पथदिवे, पंपिंग स्टेशनचा अखंडित वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक विषयांचाही आढावा घेण्यात आला.

Previous Post

शहरवासीयांनो जागे व्हा सायबर फसवणुकी पासुन सावध रहा पोलिसांचे आवाहन

Next Post

दिव्यांग प्रमाणपत्र प्रकणात दोन लिपिकही आढळले दोषी

Admin

Admin

Next Post

दिव्यांग प्रमाणपत्र प्रकणात दोन लिपिकही आढळले दोषी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697