Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

दिव्यांग प्रमाणपत्र प्रकणात दोन लिपिकही आढळले दोषी

Admin by Admin
August 1, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी।  सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बहुचर्चित बनावट दिव्यांग प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक सागर राजपूत आणि कनिष्ठ लिपिक वसीम खान या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे शासकीय रुग्णालय वर्तुळात आणि प्रशासनात तीव्र खळबळ उडाली आहे.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून त्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी मुख्य आरोपीशी थेट संबंध असलेल्या राजपूत आणि खान या दोन कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे या गैरव्यवहारातील एकूण अटक आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे.

प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस अधिकारी आणि तपासी पथक रवाना झाले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले संगणक, हार्ड डिस्क, प्रिंटर तसेच त्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून खंगाळले जात आहेत. हे बनावट प्रमाणपत्र वितरणाचे जाळे किती मोठे आहे, आतापर्यंत किती लोकांना अशी बनावट प्रमाणपत्रे वाटण्यात आली आणि यामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का, या दिशेने पोलीस सखोल तपास करत आहेत. तपासाचा भाग म्हणून रुग्णालयातील जुने दाखले, कागदपत्रे आणि अधिकृत नोंदींचीही पडताळणी सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडीत ४८ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. सिव्हिल प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

द्दवाढ भागात उभारणार नवीन सबस्टेशन

Next Post

सोलापुरात भाजप नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊत विरुद्ध दिली फौजदार चावडीत तक्रार

Admin

Admin

Next Post

सोलापुरात भाजप नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊत विरुद्ध दिली फौजदार चावडीत तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697