प्रतिनिधी । सोलापूर
आदिला नदीच्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन रेखांकनाच्या आधारावर व इतर अभ्यासानुसार सध्या कोणत्याही घरांवरती कारवाई करणार नाही असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे ज्यांना आपल्या घरावर कारवाई होणार आहे याची भीती होती त्यांची भीती आता संपली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
मात्र यापूर्वी नदी पत्रात असणाऱ्या जमिनी बाबत नवीन मंजूर करण्यात आलेले ले-आउट आहेत ते रद्द करण्यात येतील असे जाहीर केल्याने प्लॉटधारक आणि विकासकांना हायटेन्शन असणार आहे. जनतेची सुरक्षा आणि पूर धोका परिस्थिती याचे अवलोकन करूनच हा निर्णय घेतल्याचेही गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत प्रशासनाने सांगितलेलं सूचनेचे अनुकरण करावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
