Friday, July 24, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सेवाभाव जपत वारकऱ्यांना हरिपाठ व फराळ तर पोलिसांना रेनकोटचे केले वाटप

Admin by Admin
July 24, 2026
in solapur
0
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सेवाभाव जपत वारकऱ्यांना हरिपाठ व फराळ तर पोलिसांना रेनकोटचे केले वाटप

प्रतिनिधी । नातेपुते

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच नातेपुते येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष आदरणीय गिरीशजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जपणूक करत बँकेने वारकरी भाविक तसेच वारी व्यवस्थापनात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा उपक्रमांचे आयोजन केले होते.

या उपक्रमांतर्गत हजारो वारकरी भाविकांना अखंड हरिपाठ पुस्तिकांचे वाटप तसेच फराळाचे वितरण करण्यात आले. वारीच्या सेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षणासाठी उत्कृष्ट दर्जाचे रेनकोट भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे वारकरी आणि पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.

यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एटीएम व्हॅन देखील नातेपुते ते पंढरपूर या वारी मार्गावर सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी भाविकांना प्रवासादरम्यान सहजपणे रोख रक्कम व बँकिंग सुविधा उपलब्ध होत असून या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ वारकऱ्यांना होत आहे.
या सेवाभावी उपक्रमात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या परिसरातील जवळपास सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर येथील क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. किशोर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

बारड ते नातेपुते या वारी मार्गावर त्यांनी वारकऱ्यांसमवेत पदयात्रेत सहभागी होत सेवाभावाचा संदेश दिला. यावेळी बोलताना बँकेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि समाजाशी नाते दृढ करणारा महोत्सव आहे. या पवित्र सोहळ्यात वारकरी भाविकांच्या सेवेसाठी योगदान देता येणे ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी अभिमानाची बाब आहे.

Previous Post

संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू …

Admin

Admin

Next Post

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

by Admin
July 24, 2026
0

सब हेड ।  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची केली विचारपूस प्रतिनिधी  । पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर...

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू …

by Admin
July 24, 2026
0

सब हेड । प्रशासन झोपेत आहे का ? नागरिकांचा सवाल प्रतिनिधी । सोलापूर भवानी पेठेत नववर्षाच्या चिमुकल्याचा रेबीज मुळे मृत्यू...

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सेवाभाव जपत वारकऱ्यांना हरिपाठ व फराळ तर पोलिसांना रेनकोटचे केले वाटप

by Admin
July 24, 2026
0

प्रतिनिधी । नातेपुते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच नातेपुते येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष आदरणीय...

संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

by Admin
July 24, 2026
0

प्रतिनिधी । पंढरपूर   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित 'संवादवारी' ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

आषाढी यात्रेत वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका त्वरित मिळाले

by Admin
July 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर आषाढी यात्रा २०२६ दरम्यान वाखरी येथे कीर्तन करत असताना श्री. दिगंबर जाधव, वय ६०, रा. हदगांव, जिल्हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ५६ उपक्रमांचा विक्रम; मनपा शाळा क्र. ३ मध्ये शालेय साहित्य वाटप

by Admin
July 22, 2026
0

सभेहेड ।  प्रभाग क्रमांक १ मध्ये उपक्रम क्रमांक १ उत्साहात संपन्न; नगरसेवक श्रीनिवास दायमा यांचा पुढाकार प्रतिनिधी । सोलापूर  ...

दर्शन रांगेत थकलेल्या वयोवृद्ध जोडप्यांना घडवले थेट दर्शन वारकरी हाच व्हीआयपी मानून प्रशासनाने घडवले दर्शन

by Admin
July 21, 2026
0

प्रतिनिधी । पंढरपूर   विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात येणारा भाविक हा दर्शन रांगेत उभा असतो. दर्शन रांगेतील सामान्य भाविकांना सुलभ...

बसवारुढ मठात टाकली धार्मिक भावना दुखावणारी चिठठी एका महिलेवर गुन्हा दाखल

by Admin
July 20, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर धार्मिक भावना दुखावल्याचा आणि धमकी दिल्याचा प्रकार सोलापुरात समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका...

विठ्ठलाच्या दर्शनाला  येणारा वारकरीच व्हीआयपी  पालकमंत्री जयकुमार गोरे

by Admin
July 16, 2026
0

सब हेड ।  जिल्ह्यातील सर्व अधिकारी वारकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करतील,  गोरे यांनी केली वाखरी पालखी तळाची पाहणी प्रतिनिधी...

एमआयडीसी चिंचोली येथील जी.पी. इंडस्ट्रीजमध्ये दुर्घटना; टँकरमध्ये पाणी भरताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

by Admin
July 16, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर एमआयडीसी चिंचोली येथील जी.पी. इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697