Thursday, October 8, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

विठ्ठलाच्या दर्शनाला  येणारा वारकरीच व्हीआयपी  पालकमंत्री जयकुमार गोरे

Admin by Admin
July 16, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड ।  जिल्ह्यातील सर्व अधिकारी वारकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करतील,  गोरे यांनी केली वाखरी पालखी तळाची पाहणी

प्रतिनिधी । सोलापूर

पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी आहे. त्यामुळे वारकऱ्यांना व्हीआयपी समजूनच सेवासुविधा पुरवल्या जात आहेत. म्हणूनच इतर कोणत्याही व्हीआयपींना विठ्ठल मंदिरात थेट दर्शन दिले जाणार नाही. वारकऱ्यांना सहज आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठीच आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करावे. तसेच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरी नगरी सजवण्यात यावी. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले असून स्वागत कमानींसह विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आषाढीच्या निमित्ताने येणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन किंवा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना फोन करावा. जिल्ह्यातील अधिकारी आणि पालकमंत्री वारकऱ्यांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करतील आणि वारकऱ्यांच्या अडचणी सोडवतील,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*वाखरी पालखी तळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी*
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांसह इतर संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. नवमी दिवशी वाखरी येथे अनेक पालख्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे वाखरी पालखी तळावर मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे वाखरी पालखी तळावर काही ठिकाणी पाणी साचले होते. तळावर पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी सिमेंट पाईप टाकावेत, मुरमीकरण करून पाण्याला उतार करावा, कोठेही खड्डे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. वारकरी भाविकांच्या सुविधेबाबत कोणतीही कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व यंत्रणांनी नेमून दिलेली कामे पूर्ण करावीत. सुविधांसाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास तो जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

एमआयडीसी चिंचोली येथील जी.पी. इंडस्ट्रीजमध्ये दुर्घटना; टँकरमध्ये पाणी भरताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Next Post

बसवारुढ मठात टाकली धार्मिक भावना दुखावणारी चिठठी एका महिलेवर गुन्हा दाखल

Admin

Admin

Next Post

बसवारुढ मठात टाकली धार्मिक भावना दुखावणारी चिठठी एका महिलेवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697