
प्रतिनिधी । सोलापूर
आषाढी यात्रा २०२६ दरम्यान वाखरी येथे कीर्तन करत असताना श्री. दिगंबर जाधव, वय ६०, रा. हदगांव, जिल्हा नांदेड या वारकरी भाविकास तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने एक रुग्ण स्वतःहून तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे दाखल झाला.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व मा आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे, आषाढी यात्रा २०२६ आयसीयू नोडल अधिकारी डॉ. महेश कुमार सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डॉ. सीमा इंगोले यांनी रुग्णाचा ECG काढून तातडीने रुग्ण आयसीयू मध्ये दाखल केला व त्यास थ्रोम्बोलायसिस (Thrombolysis) करण्यात आले.