Friday, October 9, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

Admin by Admin
July 24, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड ।  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची केली विचारपूस

प्रतिनिधी  । पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

छत्रपती संभाजीनगर येथील भाविक बाळू आसाराम पडूळ (वय ५४) हे दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तीन रस्ता येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे पाठवले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा ईसीजी काढण्यात आला. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने सोलापूरला पुढील उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे हृदयरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.

दरम्यान, रुग्ण बाळू आसाराम पडूळ यांना एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूर विमानतळावर आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांकडून रुग्णाच्या उपचाराबत माहिती घेतली व आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल आदी उपस्थित होते.

https://newswala24.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260724-WA0073.mp4

आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी यावर्षी राज्य शासनाने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे गंभीर रुग्णांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवणे शक्य झाले आहे.

 

Previous Post

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू …

Next Post

राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःवरच गोळ्या झाडून केली आत्महत्या

Admin

Admin

Next Post

राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःवरच गोळ्या झाडून केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697