Thursday, November 19, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

Admin by Admin
November 18, 2026
in solapur
0
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

स्वच्छता, पाणीपुरवठा, भाविकांच्या सुविधा व वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना

पंढरपूर, (दि. १८) : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज वाखरी पालखी तळ, सरगम चौक, चंद्रभागा वाळवंट व भक्तीसागर परिसराची पाहणी करून संबंधित विभागांकडून तयारीचा आढावा घेतला. यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कार्तिकी शुद्ध एकादशी २१ नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी १० ते २४ नोव्हेंबर असा आहे. या काळात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून व्यवस्थेची माहिती घेतली.

चंद्रभागा नदीपात्र व घाट परिसरात स्वच्छता कायम राखण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. नदीकाठावरील काटेरी झाडे-झुडपे काढावीत, घाटांवरील माती हटवून घाट स्वच्छ धुऊन घ्यावेत. घाटांच्या कोपऱ्यांमध्ये साचलेला कचरा तातडीने हटवावा. नदीपात्रात वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाळवंटात खाद्यपदार्थ व माळा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमुळे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.

भक्तीसागर परिसरात दिंड्यांसोबत येणारे वारकरी व भाविक मोठ्या संख्येने वास्तव्यास असतात. त्यांच्या सोयीसाठी नदीपात्रात जाण्या-येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या घाटाचे मुरुमीकरण व सपाटीकरण तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

वाखरी पालखी तळावर कार्तिकी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो. या ठिकाणी जनावरे व पशुपालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांच्या उपचारासाठी २४ तास पशुवैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

सरगम चौक येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक उपाययोजना करून वाहतूक सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनी चंद्रभागा वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूमची संख्या वाढविणे तसेच परिसरात वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करण्याची सूचना केली.

या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी सीताराम डुबल, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी आदी उपस्थित होते.

Previous Post

मानस्तंभ व मूर्ती दातार म्हणून स्व. बाळकृष्ण तात्या कंदुले परिवार,

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

by Admin
November 18, 2026
0

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी स्वच्छता, पाणीपुरवठा, भाविकांच्या सुविधा व वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना...

मानस्तंभ व मूर्ती दातार म्हणून स्व. बाळकृष्ण तात्या कंदुले परिवार,

मानस्तंभ व मूर्ती दातार म्हणून स्व. बाळकृष्ण तात्या कंदुले परिवार,

by Admin
November 18, 2026
0

मानस्तंभ व मूर्ती दातार म्हणून स्व. बाळकृष्ण तात्या कंदुले परिवार, कासार मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री विलास जगन्नाथ कंदले, मंदिर ट्रस्टी...

डीसीसी बँकेच्या नऊ जागांसाठी आता रंगणार रणसंग्राम

by Admin
November 17, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. १९...

कर्जाच्या आमिषाने ७७ लाखांचा गंडा; पैसे मागताच बिश्नोई गँगची धमकी!

by Admin
November 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर १५ कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक; बनावट शासकीय शिक्के, डिजिटल अरेस्टचा धाक सोलापूर : गोल्डन...

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

by Admin
November 14, 2026
0

    प्रतिनिधी । सोलापूर   प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या वतीने सोलापुरात बीके शिवानी दीदी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

by Admin
November 12, 2026
0

  प्रतिनिधी ।सोलापूर सोलापूर विमानतळावर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या लँडिंगदरम्यान पुढील चाकाचा (नोज व्हील) टायर फुटल्याची घटना गुरुवारी...

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

by Admin
November 2, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर सातारा, ठाणे आणि बीड येथील न्यायालयांनंतर आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा...

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

by Admin
November 2, 2026
0

  सब हेड । पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई प्रतिनिधी । सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत...

ब्रेकिंग न्यूज ; एफडीने केला १९.४३ लाखांचा अन्नसाठा जप्त

by Admin
October 31, 2026
0

      सब हेड ।  अंत्रोळी येथील ‘मेसर्स गणेश रामचंद्र आपटे प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावरही छापा प्रतिनिधी । सोलापूर...

बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा पर्दाफाश ; सहा जण ताब्यात

by Admin
October 27, 2026
0

सब हेड  । लग्नाचे आमिष दाखवून २.१७ लाखांची फसवणूक ; रोकड, दागिने लंपास प्रतिनिधी । सोलापूर लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697