सब हेड । लग्नाचे आमिष दाखवून २.१७ लाखांची फसवणूक ; रोकड, दागिने लंपास
प्रतिनिधी । सोलापूर
लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची २ लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करून एक लाख रुपये रोख आणि दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुणे, जालना व सोलापूर जिल्ह्यांतून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
फिर्यादी सुरज संजय पवार (वय ३१, रा. गुरुदत्त नगर, सैफुल, सोलापूर) यांना योगिता दत्तात्रय सूर्यवंशी हिच्याशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून एजंट फी घेण्यात आली. लग्नानंतर पवार यांच्या घरी राहणाऱ्या योगिताने ते पंढरपूरला गेले असताना घरातील रोकड व सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले.
या प्रकरणी ज्योती धनंजय लोंढे, सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनिता सुनील दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर आणि सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, पोउपनि संतोष काजळे, सफौ आप्पा पवार, रश्मी जाधव, गणेश शिर्के, सनी राठोड, श्रीरंग काशीद, रमेश कोर्सेगाव, राजू पवार, संतोष चानकोटी आणि स्वाती भोसले यांनी कारवाई केली. आरोपींच्या अन्य गुन्ह्यांतील सहभागाचा तपास सुरू आहे.
