Sunday, November 15, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

कर्जाच्या आमिषाने ७७ लाखांचा गंडा; पैसे मागताच बिश्नोई गँगची धमकी!

Admin by Admin
November 14, 2026
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी । सोलापूर

१५ कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक; बनावट शासकीय शिक्के, डिजिटल अरेस्टचा धाक

सोलापूर : गोल्डन टॉवर प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ७७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी बनावट शासकीय शिक्के व स्वाक्षऱ्यांचा वापर करून ब्लॅकमेल केले. तसेच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटरकडून जीवे मारण्याची आणि डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी समीर वाल्मीक अहिरे (रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून हरजित सिंग रुपराह, धर्मेंद्र विनोदानंद झा, आरव अग्रवाल, अशोक सिंधल, दीपक अरोरा, मोहिणी धर्मेंद्र झा आणि गणेश देशमुख यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी दिल्ली व छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ऑगस्ट २०२५ पासून गणेश देशमुख व झा यांनी १५ कोटी रुपयांचे कर्ज विनाकमिशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दिल्लीतील अन्य आरोपींशी ओळख करून दिली. साईट व्हिजिट व कायदेशीर कागदपत्रांसाठी दोन लाख, स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली ५० लाख आणि अन्य कारणांसाठी संतोष राठोड व मनोज सुरवसे यांच्यामार्फत २५ लाख २५ हजार रुपये घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण ७७ लाख २५ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर आरोपींनी कर्ज मंजुरीचे बनावट पत्र तयार करून त्यावर सब रजिस्ट्रार कार्यालय, सोलापूर क्र. २ यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी केली. मात्र, कर्ज मंजूर न झाल्याने फिर्यादीने पैसे परत मागितले.

यावेळी धर्मेंद्र झा याने लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर असल्याचे सांगून संतोष राठोड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर हरजित सिंग याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला घर सोडून जाण्यास सांगत अन्यथा डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अशा प्रकारे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा संशयास्पद प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी. या आरोपींविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथेही गुन्हा दाखल झाल्याची माहिती असून, त्याची पडताळणी करून तपास सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि बालाजी मस्के यांनी दिली.

Previous Post

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जाच्या आमिषाने ७७ लाखांचा गंडा; पैसे मागताच बिश्नोई गँगची धमकी!

by Admin
November 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर १५ कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक; बनावट शासकीय शिक्के, डिजिटल अरेस्टचा धाक सोलापूर : गोल्डन...

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

by Admin
November 14, 2026
0

    प्रतिनिधी । सोलापूर   प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या वतीने सोलापुरात बीके शिवानी दीदी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

by Admin
November 12, 2026
0

  प्रतिनिधी ।सोलापूर सोलापूर विमानतळावर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या लँडिंगदरम्यान पुढील चाकाचा (नोज व्हील) टायर फुटल्याची घटना गुरुवारी...

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

by Admin
November 2, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर सातारा, ठाणे आणि बीड येथील न्यायालयांनंतर आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा...

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

by Admin
November 2, 2026
0

  सब हेड । पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई प्रतिनिधी । सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत...

ब्रेकिंग न्यूज ; एफडीने केला १९.४३ लाखांचा अन्नसाठा जप्त

by Admin
October 31, 2026
0

      सब हेड ।  अंत्रोळी येथील ‘मेसर्स गणेश रामचंद्र आपटे प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावरही छापा प्रतिनिधी । सोलापूर...

बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा पर्दाफाश ; सहा जण ताब्यात

by Admin
October 27, 2026
0

सब हेड  । लग्नाचे आमिष दाखवून २.१७ लाखांची फसवणूक ; रोकड, दागिने लंपास प्रतिनिधी । सोलापूर लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने...

दयानंद कॉलेज परिसरात आगीचा भीषण भडका; तीन आस्थापनांची राखरांगोळी

by Admin
October 18, 2026
0

    पेटलेल्या दुचाकीचा हा व्हिडिओ ... प्रतिनिधी । सोलापूर शहरात रविवारी (१८ ऑक्टोबर) आगीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने खळबळ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर केला वारंवार अत्याचार

by Admin
October 18, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर मॅट्रिमोनी साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी केतन अनिल...

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

by Admin
October 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर साखरपेठेतील कै. यशोदाबाई दिड्डी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामागील महापालिकेच्या वाचनालयाच्या इमारतीत अनधिकृत सायकल गोडाऊन आणि प्रतिबंधित...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697