Friday, October 16, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

Admin by Admin
October 14, 2026
in solapur
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी । सोलापूर

साखरपेठेतील कै. यशोदाबाई दिड्डी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामागील महापालिकेच्या वाचनालयाच्या इमारतीत अनधिकृत सायकल गोडाऊन आणि प्रतिबंधित गुटखा-मावा निर्मितीचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या पाहणीत हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. संबंधित ठिकाणचे साहित्य जप्त करण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य केंद्राची इमारत जर्जर झाली असून, छताचे स्लॅब कोसळत असल्याच्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी होत्या. पाहणीसाठी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, उपअभियंता अविनाश वाघमारे, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर आणि कनिष्ठ अभियंता सलमान मणियार आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी मागील आवाराची पाहणी केली असता, महापालिकेच्या जागेतील अनधिकृत व्यवसाय उघडकीस आला.
आरोग्य केंद्रामागील सुमारे ५०० ते ६०० चौरस फुटांच्या वाचनालयाच्या इमारतीचे कुलूप व दरवाजा तोडून त्यावर कब्जा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. इमारतीत विक्रीसाठी १०० ते २०० नवीन सायकली, टायर्स, ट्यूब्स आणि गॅरेजचे साहित्य साठवण्यात आले होते. तसेच शेजारील खोलीत ओला व सुका मावा आणि प्रतिबंधित गुटखा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. येथे टेबल-खुर्च्यांची व्यवस्था करून कामगार दिवसभर मावा तयार करत असल्याची माहिती समोर आली.
दिवसभर माव्याची निर्मिती; कर्मचाऱ्यांना धमकी
या बेकायदेशीर व्यवसायाला आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधितांनी त्यांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. रुग्णालयात रुग्ण उपचारांसाठी येत असताना, त्याच परिसरातील महापालिकेच्या जागेत असे प्रकार सुरू असल्याचे पाहून आयुक्तांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
२०० सायकलींसह साहित्य जप्त
आयुक्तांच्या आदेशानंतर अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी गोडाऊनमधील सायकली सील केल्या असून, तेथील साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाहणीवेळी धक्कादायक प्रकार उघड
“पाहणीसाठी मागील बाजूस गेल्यानंतर हा प्रकार पाहून आम्हालाही धक्का बसला. त्यावेळी आयुक्तांनी घटनास्थळी थांबून कारवाई करण्यास सांगितले. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे,” अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील यांनी दिली.

Previous Post

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

by Admin
October 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर साखरपेठेतील कै. यशोदाबाई दिड्डी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामागील महापालिकेच्या वाचनालयाच्या इमारतीत अनधिकृत सायकल गोडाऊन आणि प्रतिबंधित...

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697