
प्रतिनिधी । सोलापूर
मॅट्रिमोनी साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी केतन अनिल शहा (रा. गणेश कॉलनी, सिव्हिल चौक) याच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २३ फेब्रुवारी ते १ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पीडित महिलेची आरोपीशी मॅट्रिमोनी साईटवरून ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसेच खर्चासाठी पैसे आणि सोन्याची अंगठी घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने त्याच्या ‘अनिल एजन्सी’ दुकानातून तिला हाकलून देत शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडितेच्या अर्ज व जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सुरज कुतवळ पुढील तपास करीत आहेत.
