Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

Admin by Admin
August 22, 2026
in solapur
0
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले
माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी
सोलापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस व अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७१ हजार ९५६ संशयास्पद व अपात्र लाभार्थी रेशन यादीतून वगळण्यात आले आहेत. आधार डेटाबेस, ई-केवायसी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पुरवठा विभागाने ११ तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून लाभार्थ्यांची माहिती तपासली. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले, प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहनधारक, कंपनी किंवा विविध मंडळांचे संचालक, तसेच मयत, दुबार नोंदणी झालेले आणि दीर्घकाळ धान्य न उचलणारे लाभार्थी या तपासणीत आढळून आले.
तालुकानिहाय पाहता माळशिरस येथे सर्वाधिक १० हजार ८७७, माढा १० हजार १५३, बार्शी ९ हजार १६, पंढरपूर ८ हजार १८०, अक्कलकोट ६ हजार १८७, सांगोला ६ हजार ३३ आणि दक्षिण सोलापूरमध्ये ५ हजार ८५८ संशयास्पद लाभार्थी आढळले. करमाळा व मंगळवेढा प्रत्येकी ४ हजार ७९४, मोहोळ ३ हजार ५९३, तर उत्तर सोलापूरमध्ये १ हजार ९२२ लाभार्थींचा समावेश आहे.
वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले ४१ हजार ३१२, दीर्घकाळ धान्य न उचलणारे १३ हजार ९२६, बोगस ५ हजार ४, आधार स्टेटसमध्ये त्रुटी असलेले ३ हजार ९८०, कंपनी संचालक ३ हजार ९७ आणि मोठी वार्षिक उलाढाल असलेले २ हजार ८९१ लाभार्थी आहेत. याशिवाय १०० वर्षांहून अधिक वयाचे १ हजार ७६ आणि चारचाकी वाहनधारक ४७३ लाभार्थीही आढळले.
दरम्यान, पात्र लाभार्थी रेशनच्या धान्यापासून वंचित राहू नयेत, याची काळजी घेतली जात असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. नजरचुकीने नाव वगळले असल्यास ते पुन्हा यादीत समाविष्ट केले जात आहे. निर्धारित उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या लाभार्थ्यांनी स्वतःहून नाव वगळून घेण्यासाठी पुरवठा विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी केले आहे.

Previous Post

गावठी पिस्तूल, पाच काडतुसे जप्त; कर्नाटकातील दोघांना अटक

Next Post

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

Admin

Admin

Next Post
अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697