Thursday, October 8, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

गावठी पिस्तूल, पाच काडतुसे जप्त; कर्नाटकातील दोघांना अटक

Admin by Admin
August 21, 2026
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी ।  सोलापूर 

विजापूर-सोलापूर मार्गावर गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरुणास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून पिस्तूल व काडतुसे पुरविणाऱ्या आईस्क्रीम विक्रेत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघेही कर्नाटकातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मंजूनाथ शांतप्पा निरणशेट्टी (वय ३९, रा. इंडी, विजापूर, कर्नाटक) याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला विजापूर-सोलापूर मार्गावर मोटारसायकलवरून एक व्यक्ती गावठी पिस्तूल व काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने १९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.२६ वाजता मंजूनाथ निरणशेट्टी याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याकडे लोखंडी बॉडी असलेले देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान मंजूनाथ याने हे पिस्तूल व काडतुसे इंडी येथील त्याचा मित्र, आईस्क्रीम विक्रेता घनश्याम दल्लीचंद जाट (वय २७, रा. राजस्थान, सध्या इंडी, कर्नाटक) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घनश्याम जाट यालाही अटक केली.
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण आणि पोलिस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. पथकात सपोनि शितलकुमार गायकवाड, आप्पासाहेब पवार, सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे, गणेश शिर्के, संतोष माने, स्वप्नील जाधव, राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरवसे, राहुल विटकर, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगाव आणि श्रीरंग काशिद यांचा समावेश होता.

Previous Post

अकलूज पोलिसांनी  १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त करत बेकायदा शस्त्र विकणाऱ्याना केले जेरबंद

Next Post

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

Admin

Admin

Next Post

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका" मिशन सुधारने" केली मोठी सुधारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697