Tuesday, October 6, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाले व्यासपीठ; रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे गुणवंतांचा गौरव आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Admin by Admin
August 4, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात प्रभावी वक्तृत्वकला, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, या व्यापक उद्देशाने रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. लहान व मोठ्या गटातील तब्बल ६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या वक्तृत्वाची प्रभावी छाप उमटवली.

स्पर्धेची सुरुवातही विशेष ठरली. शाळेतील आठवणी जागवणाऱ्या घंटानादाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण वातावरणात उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले.

‘प्लास्टिकमुक्ती’, ‘प्रत्येक मुलाने शाळेत जायलाच हवे’, ‘एक विद्यार्थी – एक झाड’, ‘वाचन संस्कृतीचे महत्त्व’, ‘जलसंधारण – भविष्याची हमी’, ‘स्वच्छता आणि आरोग्य’, ‘आजचा विद्यार्थी – उद्याचा जबाबदार नागरिक’ आणि ‘वृक्षसंवर्धन – सामाजिक जबाबदारी’ अशा वर्तमानाशी निगडित आणि सामाजिक भान जागविणाऱ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.

वयाच्या मानाने विषयांचे गांभीर्य समजून घेत विद्यार्थ्यांनी मुद्देसूद मांडणी, ओघवती भाषा, योग्य शब्दफेक, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण यांचा सुरेख मिलाफ साधत आपले मनोगत निर्धारित वेळेत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांच्या भाषणातून पर्यावरण, शिक्षण, स्वच्छता, वाचन आणि सामाजिक जबाबदारी यांविषयीची संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवली.

https://newswala24.com/wp-content/uploads/2026/08/video_20260804_143210.mp4

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव

लहान गट :
प्रथम – शौर्य रंगापुरे
द्वितीय – शुभदा कुलकर्णी
तृतीय – मधुरा घाडगे
उत्तेजनार्थ – ओवी तडवळकर

मोठा गट :
प्रथम – दूर्वा महिंद्रकर द्वितीय – श्रुती स्वामी तृतीय – अवनी सामल
उत्तेजनार्थ – सई वाघचवरे या विद्यार्थ्यांचा रोटरी ई क्लब इलाईटचे पदाधिकारी संदीप कुलकर्णी अध्यक्ष, सेक्रेटरी डॉ. सौरभ ढोपरे, सचिन तोष्णीवाल,मनिष लोया, अभिजित छत्रबंद, आणि परीक्षकांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यातील अभिमान आणि शिक्षकांच्या कौतुकाच्या भावना या पारितोषिक वितरण सोहळ्याला विशेष भावनिक उंची देऊन गेल्या.

या स्पर्धेचे परीक्षण मराठी भाषेचे अभ्यासक व साहित्यप्रेमी केदार केसकर आणि संध्या रघोजी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भाषाशैलीबरोबरच विषयाची समज, आशयाची मांडणी, वक्तृत्वातील आत्मविश्वास, सादरीकरण आणि वेळेचे भान या विविध निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.

स्पर्धेसाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटच्या शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

“आजचा आत्मविश्वासपूर्ण वक्ता म्हणजे उद्याचा सक्षम आणि जबाबदार नागरिक” या विचाराची प्रचिती देणाऱ्या या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच नवी दिशा मिळाली.

Previous Post

अखेर मनपा आयुक्तांनी थांबवले विमानतळ ते साखर कारखाना रस्त्याचे काम ….

Next Post

कष्ट करणाऱ्या कामगार मातेला नॉर्मल असो की सिजेरियन मिळणार २५ हजारांची मदत

Admin

Admin

Next Post

कष्ट करणाऱ्या कामगार मातेला नॉर्मल असो की सिजेरियन मिळणार २५ हजारांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697