Friday, October 9, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते एडवोकेट ऍड. थोबडे यांचा भव्य सत्कार संपन्न

Admin by Admin
July 25, 2026
in solapur
0
0
SHARES
220
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या सदस्यपदी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय संपादन केल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ
ॲड. मिलिंद थोबडे यांचा सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने अत्यंत भव्य व दिमाखदार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा विशेष सरकारी अभियोक्ता तथा राज्यसभा खासदार पद्मश्री मा. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे अत्यंत उत्साही आणि गर्दीच्या वातावरणात पार पडला.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी केले. प्रास्ताविक करताना त्यांनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्या तब्बल तीन कार्यकाळांतील उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला आणि सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. तदनंतर सोलापूर बारचे उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख यांनी ॲड.महादेव विनायक गोटे यांनी शब्दांकित केलेल्या ॲड. मिलींद थोबडे यांच्या अष्टपैलू कायदेशीर कारकिर्दीचा व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन केले.

या विशेष प्रसंगी सोलापूर विधी क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व नामांकित वकिलांनी आपले विचार मांडले. यामध्ये ॲड. शरद पाटील, ॲड. मंगला चिंचोळकर, ॲड. श्रीनिवास क्यातम, ॲड. डी. एन. भडंगे, ॲड. संजीव सदाफुले आणि ॲड. अमोगसिद्ध साखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “ॲड. मिलिंद थोबडे यांनी नेहमीच नवोदित वकिलांना पाठीशी घातले आहे. राज्यातील वकिलांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी त्यांनी बार कौन्सिलमध्ये बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे,” असा सूर सर्व वक्त्यांच्या भाषणातून उमटला.सत्काराला भावूक उत्तर देताना ॲड. मिलिंद थोबडे म्हणाले की, “सोलापूरच्या वकील वर्गाने आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेला हा विजय माझा एकट्याचा नसून सोलापूरच्या संपूर्ण विधी क्षेत्राचा विजय आहे. भविष्यातही वकिलांच्या कल्याणासाठी आणि न्यायालयाच्या बळकटीकरणासाठी मी कटिबद्ध राहीन.” यानंतर कार्यक्रमात पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी अध्यक्षीय भाषण केले. ॲड. मिलींद थोबडे यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांनी सोलापूर बार असोसिएशनच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मनोज पामुल व ॲड. मलसिद्ध देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पाहुण्यांचे, उपस्थित वकील बंधू-भगिनींचे आभार बारचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी मानले. या दिमाखदार सोहळ्याच्या मंचावर ॲड. मिलिंद थोबडे यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुचिता थोबडे उपस्थित होत्या तसेच मंचावर सोलापूर बार असोसिएशनच्या सहसचिवा ॲड. मीरा प्रसाद यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, महिला वकील, नवोदित वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

देश हिताविरोधात काम करणाऱ्या परकीय शक्तींना यश नको म्हणत धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा

Next Post

सक्षम आणि रामकृष्ण सेवा प्रकल्प मॅन फाउंडेशनच्यावतीने मुलामुलींना दिली लैंगिक शिक्षणाची जाण

Admin

Admin

Next Post

सक्षम आणि रामकृष्ण सेवा प्रकल्प मॅन फाउंडेशनच्यावतीने मुलामुलींना दिली लैंगिक शिक्षणाची जाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697