Tuesday, October 6, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल – मनोज जरांगे पाटील ’

Admin by Admin
August 8, 2026
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

‘फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल’
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलनाची हाक
सोलापूर : “सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत काही कागदोपत्री पुरावेही सादर केले. “एकाची व्हॅलिडिटी होते आणि दुसऱ्याची रद्द कशी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुप्त पत्राद्वारे मराठ्यांच्या कुणबी नोंदी व प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला. “फडणवीसांच्या सांगण्यावरून आणि बावनकुळेंच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहे. शिंदे समितीने मूळ नोंदी शोधून काढल्या असताना त्या रद्द कशा केल्या जात आहेत? मराठ्यांच्या लेकराबाळांचे वाटोळे करण्याचा हा डाव उधळून लावू,” असे ते म्हणाले. तसेच आपल्यावर हल्ला किंवा अटकेचा डाव आखण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाने अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. “मराठ्यांच्या लेकरांच्या हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत आपण गप्प बसायचे नाही,” असे ते म्हणाले. यावेळी मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

नालेसफाई घोटाळ्यात नगरसेवक अनंत जाधवानी केला गंभीर प्रकार उघड आता अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

Next Post

कायद्याची जनजागृती हीच सशक्त समाजाची गुरुकिल्ली; शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Admin

Admin

Next Post

कायद्याची जनजागृती हीच सशक्त समाजाची गुरुकिल्ली; शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697