Wednesday, August 12, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

महामंडळाच्या अधिकाऱ्यांमुळे मराठा तरुणांची कोंडी- नरेंद्र पाटील ’

Admin by Admin
August 10, 2026
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

प्रतिनिधी । सोलापूर

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख हे पदाचा गैरवापर करून मराठा तरुणांसाठी जाचक नियम व अटी लावत असल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला. देशमुख यांची चौकशी करून त्यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सोलापुरात पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, “महामंडळाची स्थापना मराठा तरुणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी झाली आहे. मात्र, जाचक अटींमुळे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत व्यवस्थापकीय संचालकांना तीन-चार वेळा पत्र देऊनही दखल घेण्यात आलेली नाही.”

महामंडळाच्या कारभारामुळे मराठा तरुणांमध्ये शासनाविषयी असंतोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा मुद्दा मांडण्यात येणार असून, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

“व्यवस्थापकीय संचालकांची चौकशी करून त्यांना पदच्युत केले नाही, तर अध्यक्षपदाचा राजीनामा देईन. पदावरून पायउतार झाल्यानंतरही मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार,” असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.

 

Previous Post

आमदारांना गोळ्या घालून मारण्यासाठी पैशांचे आमिष; सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

ओबीसी आरक्षण संपले आहे का ? सरकारने भूमिका स्पष्ट करावी’ लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर पलटवार

Admin

Admin

Next Post

ओबीसी आरक्षण संपले आहे का ? सरकारने भूमिका स्पष्ट करावी’ लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर पलटवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ओबीसी आरक्षण संपले आहे का ? सरकारने भूमिका स्पष्ट करावी’ लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर पलटवार

by Admin
August 10, 2026
0

सब हेड । प्रा. हाके यांची पत्रकार परिषद प्रतिनिधी । सोलापूर कुणबी समाजाला ओबीसी आरक्षणाचा दाखला देण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय...

महामंडळाच्या अधिकाऱ्यांमुळे मराठा तरुणांची कोंडी- नरेंद्र पाटील ’

by Admin
August 10, 2026
0

    प्रतिनिधी । सोलापूर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख हे पदाचा गैरवापर करून मराठा तरुणांसाठी...

आमदारांना गोळ्या घालून मारण्यासाठी पैशांचे आमिष; सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

by Admin
August 10, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर शहरातील महावीर चौक परिसरातील एका शोरूमबाहेर विद्यमान आमदार कल्याणशेट्टी यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून आमदारांना गोळ्या घालून...

जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड

by Admin
August 10, 2026
0

प्रतिनिधी  ।  सोलापूर सालाबाद प्रमाणे नारळी पौर्णिमेला पूर्व भागातून निघणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनीच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव...

: रंगनाथन यांचे चरित्र :

by Admin
August 9, 2026
0

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृतम रंगनाथन यांचा जन्म 9ऑगस्ट 1892 रोजी मद्रास प्रंतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली ह्या गावी झाला...

ओपीडीत हृदयविकाराचा झटका; तत्पर CPR मुळे ५५ वर्षीय रुग्णाला जीवदान

by Admin
August 8, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर शहरातील रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीतच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका...

अरे देवा पोटच्या लेकीने घरात चोरी केल्याची आईने दिली फिर्याद

by Admin
August 8, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूरमि त्राच्या सांगण्यावरून घरातील मुलीनेच सोन्याचे दागिने आणि रोख ६५ हजार रुपये धक्कादायक प्रकार घोंगडे वस्ती परिसरात घडला...

कायद्याची जनजागृती हीच सशक्त समाजाची गुरुकिल्ली; शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

by Admin
August 8, 2026
0

  प्रतिनिधी  ।  सोलापूर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार समाजामध्ये...

फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल – मनोज जरांगे पाटील ’

by Admin
August 8, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर ‘फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; २९ ऑगस्टला अंतरवाली...

नालेसफाई घोटाळ्यात नगरसेवक अनंत जाधवानी केला गंभीर प्रकार उघड आता अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

by Admin
August 8, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर सोलापूर महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित आर्थिक अनियमिततेचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नालेसफाईच्या कामात कोणत्याही मक्तेदाराला...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697